मा.राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप
तुळजापूर:-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. १४ जून रोजी नळदुर्ग ता.तुळजापूर येथे शहर मनसेच्या वतीने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व्यापारी व दुकानदार यांना मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व औचित्य साधून आज नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने शहरातील व्यापारी व दुकानदार यांना मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप जिल्हासंघटक अमर कदम व जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष जोतिबा येडगे,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, नळदुर्ग शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, तालुका उपाध्यक्ष झुंबर काळदाते, वेदकुमार पेंदे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.