*उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 नवीन रुग्ण आढळले
*जिल्ह्यामध्ये चौवीस तासात ३ कोरोणा बाधित रूग्णांचा मृत्यू जिल्ह्यात चिंतेचे वातावरण
उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रविवार
( दि.१४) रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात ३ नवीन रुग्ण आढळले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ७४ स्वॅब नमुने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे
तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहे.त्या पैकी ३ रूग्ण पाॅझिटिव्ह, ७१ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दि.१४/०६/२०२० रोजी पाठवलेल्या स्वेब रिपोर्ट्स रविवार (दि.१४)ला रिपोर्ट्स प्राप्त झाले असून ३ रुग्णांचे रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आलेले आहेत.
या मध्ये एक पेशंट फनेपुर ता. लोहारा येथील असून पुणे रिटर्न आहे. एक पेशंट तामलवाडी ता. तुळजापूर येथील असून सोलापूर रिटर्न आहे. व एक पेशंट तुळजापूर येथील असून ती मुंबई रिटर्न आहे.माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी माहिती दिली .
यामध्ये उस्मानाबाद शहरातील शनिवार (दि.१३) रोजी२५ वर्षीय कोरोणा बाधित तरूणाचा मृत्यू तर आज रविवार (दि.१४) रोजी उस्मानाबाद शहरातील काका नगर येथील उस्मानपुरा भागातील कोरोणा बाधित ५० वर्षीय पुरूषाचा सकाळी मृत्यू झाला काही तासातच उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील एका ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये चौवीस तासात ३ कोरोणा बाधित रूग्णांचा मृत्यू जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
जिल्ह्यातील कोरोणामुळे मृत्यू झाल्याची संख्या ६ झाली आहे.
*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स*
कोरोनाग्रस्त:- 148
उपचार घेत असलेले :- 37
कोरोनमुक्त झालेले :-105
मृत्यू :- 06
एकूण जिल्हा 148