*वर्षभरात एक हजार झाडे भेट देण्याचा दोस्ती ग्रुप चा संकल्प....
*झाडे दान करण्याचे अवाहन
कळंब:-(प्रतिनिधी)
येथील दोस्ती तुटायची नाय... या ग्रुप च्या वतीने, यावर्षी भेट म्हणून एक हजार झाडे देण्याचा संकल्प करण्यात आला.
दोस्ती ग्रुप चे सदस्य अशोक चोंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झाड देवून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या ग्रुप ने यापूर्वी वाचन संस्कृती ला बळ देण्यासाठी “गुच्छ नको ,पुस्तके भेट द्या” हा उपक्रम राबवून पाचशे पुस्तके भेट दिली होती. यावर्षी मात्र वेळेवर पाऊस सुरू झाला आहे झाडाची वाढती तोड पाहून प्रत्येकाने जबाबदारी म्हणून झाडे लावण्याची गरज आहे. दोस्ती ग्रुप च्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस , हा यापुढे झाडे देवून साजरा करण्यात येणार आहे व मुलाप्रमाणे या झाडांचे संगोपन करावे अशी विनंती ही “ गुच्छ नको झाडे द्या” या उपक्रमाचे प्रमुख डॉ. रुपेश कवडे यांनी केली आहे.
वर्षभरात विविध सामाजिक कार्यक्रम वाढदिवस किंवा घरगुती कार्यक्रमासाठी जाताना प्रत्येकजण भेटवस्तू म्हणून झाडे देणार आहेत. यासाठी ज्यांना झाडे दान करावयाची आहेत त्यांनी ग्रुप सदस्यांकडे झाडे देण्याचे अवाहन ही डॉ. कवडे यांनी केले आहे. १९८८ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा हा व्हॉट्सअप ग्रुप असून, तीन वर्षांपासून या ग्रुपने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. जेष्ठांचा सन्मान , चारा छावणीवरील शेतकऱ्यांना जेवण , पुस्तकांची भेट, झाडे वाचवण्यासाठी अभियान, शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता दूत म्हणून काम , लॉकडाऊन च्या काळात नागरिकांना मास्क , साहित्यांचे वाटप, करण्यात आले. या ग्रुपचे महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर असे एकूण ऐंशी सदस्य आहेत ते प्रत्येक जण आपल्या भागात ठरलेले उपक्रम राबवत आहेत.
यावर्षी झाडे वाटपाचा हा उपक्रम असून त्याची सुरुवात ग्रुप सदस्य अशोक चोंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली असून त्यांचा या वेळी सह परिवार सत्कार करण्यात आला.
दोस्ती ग्रुप च्या या उपक्रमासाठी अशोक चोंदे यांनी अकरा झाडे दान केली आहेत. यावेळी डॉ. रुपेश कवडे , संतोष महामुनी, सतीश काणगुडे , नितीन लिमकर, बाळासाहेब धस, दीपक खोडसे,संजय घुले , सतीश टोणगे, श्रीनाथ चोंदे, ऋषिकेश चोंदे, पंडित जाधव, देवराज शिनगारे, उपस्थित होते.
*
चौकट*:-
*दोस्ती ग्रूप ने यावर्षी एक हजार झाडे भेट देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी या ग्रुप ला झाडे दान करावीत. झाडे भेट दिल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी पाठपुरावा ही ग्रुप सदस्य करणार आहेत*
- *डॉ.रुपेश कवडे*
*उपक्रम प्रमुख , दोस्ती ग्रुप कळंब*