Views


उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेतील सिंघमला केंद्राचे पदक जाहीर


उस्मानाबाद :- (सैफोदीन काझी)

      उस्मानाबाद पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग व्यकंट माने यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दिला जाणारा आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकताच जाहीर झाला आहे. पांडुरंग माने यांनी गडचिरोली येथे आँगस्ट २०१४ ते आँगस्ट २०१७ या कालावधीत पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असताना नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाया करून तेथील जनतेमध्ये पोलिसांच्या विषयी विश्वास निर्माण करून जनता व पोलिस यांच्यामध्ये संबंध सुधारलेत.
      या उल्लेखनीय कार्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग व्यकंट माने यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. उस्मानाबाद पोलीस दलात या या सिंघम पोलिसाचे कौतुक होत आहे.
 
Top