Views


कळंब उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांच्यातर्फे पत्रकार संघास आरोग्य किटचे वाटप

 कळंब:- (प्रतिनिधी)

सध्या महाराष्ट्रासह देशात कोरोनाने थैमान घातले असून पत्रकार ही यामध्ये रोजच्या रोज प्रत्येक घटनेची वास्तव माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत.
   अशा संकट काळात पत्रकारांनी आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कोरोना पासुन संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणारे मास्क, सॅनिटाइझर आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० याप्रकारच्या किटचे कळंब तालुक्यातील सर्व पत्रकारांना उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते समस्त पत्रकार बांधवांना आज कळंब येथे वाटप करण्यात आले.
     यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री.शिवाजी आप्पा कापसे, शहरप्रमुख श्री.प्रदिप बप्पा मेटे,तसेच कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर सर,विश्वस्त सतीश बप्पा टोणगे, शितलकुमार घोंगडे,बालाजी निरफळ,  मुस्तान मिर्झा,बालाजी सुरवसे,ओंकार कुलकर्णी,रमेश आंबिरकर आदी उपस्थित होते.
 
Top