Views


*खासदार ओमराजे निंबाळकर याची हासेगाव (केज)ला भेट,आर्सेनिक अलबम 30 चे वाटप* 

 उस्मानाबाद :-(सलमान मुल्ला)

कळंब तालुक्यातील  हासेगाव(केज) येथे काल दि.०५ रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिली.तसेच शिवसेना पक्षामार्फत गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आयुष्य मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या वाटपासाठी सुपूर्द करण्यात आल्या.

 या गोळ्याचा वापर करण्याचा तसेच येणाऱ्या काळात सजग राहून मुंबई पुणे व अन्य राज्यातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनास कळवावी व कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आनण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी येणाऱ्या काळात सतर्क राहावे. तसेच नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 

यावेळी कळंब-उस्मानाबाद चे आ.कैलास घाडगे-पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी श्री.आप्पा कापसे, तहसीलदार सौ.मंजुषा लटपटे, गटविकास अधिकारी श्री संदिप राजगुरू, कळंब पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षण श्री दराडे, तालुका आरोग्य अधिकारी श्री.डॉ. जाधव, शिवसेना कळंब शहरप्रमुख श्री.प्रदिप बप्पा मेटे, सरपंच विश्वंभर पाटील, प्रविण यादव, बंडू यादव, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.
 
Top