Views





*व्हाइस ऑफ मिडियाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि कर्तुत्ववान व्यक्तींचा सत्काराचे आयोजन*


कळंब/प्रतिनिधी 



पत्रकार बांधवांच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया कळंब यांच्यावतीने दर्पण दिनानिमित्त बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी मुंडे कॉम्प्लेक्स परळी रोड कळंब येथे ज्येष्ठ पत्रकार व कर्तुत्वांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.विश्वनाथ अण्णा तोडकर (सचिव पर्याय संस्था हासेगाव) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट इंग्लिश स्कूलचे संचालक श्री .रवी नरहिरे तर उद्घाटक म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. विजय चोरडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री. संजय पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संजय पवार, उपविभागीय अधिकारी (एसीबी) श्री. सिद्राम म्हेत्रे, तहसीलदार श्री.हेमंत ढोकले, पोलीस निरीक्षक श्री रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोकी श्री. विलास हजारे, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाहक श्री. अमर चोंदे, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर श्री. गोरक्षनाथ मदने, व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष दक्षिण अहिल्यानगर कार्याध्यक्ष श्री. गणेश कविटकर, व्हॉइस ऑफ मेडिया अहिल्यानगर उपाध्यक्ष गडाख धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. हुंकार बनसोडे तर ज्येष्ठ पत्रकार म्हणून श्री. ज्ञानेश्वर पतंगे, श्री.परमेश्वर पालकर, श्री.शितल कुमार धोंगडे तर सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री.गणेश अण्णा शिंदे,श्री् माधव सिंग राजपूत, श्री. सुभाष घोडके, श्री. दिलीप झोरी, श्री. तुळशीराम चंदनशिवे, शरद चंद्र महाविद्यालय शिरढोण प्राचार्य प्रा.डाॅ. साजेद चाऊस तर आदर्श मुख्याध्यापक म्हणून श्री.राजेंद्र बिक्कड,अस्थिरोग तज्ञ डॉ. श्री.अजित देशमुख,दंत रोग तज्ञ श्रीमती डॉ. करिष्मा शेख हे या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून आणि सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया कळंब शाखेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे


 
Top