*दिवसा घरफोडी करणार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात*
*सोन्याच्या दागिने सह 15,09,600/- मुद्देमाल जप्त*
धाराशिव/प्रतिनिधी
दिवसा घरफोडी करणारा चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सोन्याच्या दागिने सह एकूण रोख रक्कम 15,79,600/- चा मुद्देमाल चोरट्यास धाराशिव गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रिक विश्लेषणातुन तत्काळ ताब्यात घेतले
कळंब तालुक्यातील वडगाव येथे शुक्रवार(दि.07) रोजी घराचे दरवाजचा लोखंडी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याच्या दागिने सह एकूण रोख रक्कम 15,79,600 रूपये मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेची येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले होते
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रिक विश्लेषणातुन आरोपीचा शोध घेतला असता. एका इसमाचे नाव समोर आले सदरबाबत पथकाने तत्काळ
अधिक खात्री केली असता सुरज दादासाहेब शिनगारे रा.शेलगाव (दि) ता. कळंब जि. धाराशिव याने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाल्याने तत्काळ आरोपी चे शोध घेऊन त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला आरोपीने उडवा उडवी चे उत्तर दिले. त्या नंतर पथकाने त्यास खाकीचा धाक दाखताच आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी कडून पथकाने चोरी केलेले 18 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 40,000/- व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सह एकुण 15,09,600/- किंमतीचे मुद्देमाल जप्त केले
सदर कारवाई ही धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, महिला पोलीस हवालदार शैला टेळे, पोलिस अंमलदार योगेश कोळी, चालक रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे