कळंब/प्रतिनिधी
ईद - ए.-- मिलादुन्नबी हजरत महंमद पैगंबर जयंतीनिमित्त रविवार (दि.22 )रोजी भव्य जुलुस काढण्यात आला. शहरातील ढोकी रोड येथील मक्का मशीद येथे शहरातून मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन फातेहाखानी करून जुलूस मिरवणूक काढण्यात आली या जुलूस मिरवणूक मध्ये मक्का-मदिना, अजमेर शरीफ दर्ग्याचे, प्राकृतिक बनवून ट्रॅक्टर, पिंक-अप जीप, आदी वाहानांतुन मिरवणूक काढण्यात आली यावेळी जुलूस मिरवणूकीत घोडे उंट याचे सहभाग करण्यात आले होते तसेच नाथ, कवाली, चे पठण करत जुलूस मिरवणूक ढोकी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मेन रोड, बागवान चौक , मोमीन गल्ली, भुईगल्ली, कुरेशी गल्ली, येथून जुलूस मिरवणूक काढण्यात आली या मध्ये धार्मिक पोषाख परिधान केलेले दारुलूम ऊर्दू शाळेचे विद्यार्थी, लहान मुले, हे विशेष सहभाग होता जुलूस मिरवणूक मध्ये तरूण , वृध्द समाज बांधवांचे ही विशेष झाले होते सहभागी झालेल्या ठिक ठिकाणी स्टाॅल उभा करून समाज बांधवांच्या वतीने लाडू, शरबत, मिठाई, केळी, थंड पाणी, पाणी चे बोटल, आदी वाटप करण्यात आले जुलूस मिरवणूक ची सांगता ही शहरातील हजरत महाबुद बाबा दर्गा येथे झाली
चौकट
ईद -ए-मिलादुनन्नबी हजरत महंमद पैगंबर यांची जयंती ही सोमवार (दि. 16) रोजी होती याच दिवशी गणपती विसर्जन असल्याने कळंब शहरातील मुस्लिम समाजाने रविवार (दि.22) रोजीकरून ईद -ए-मिलादुनन्नबी महंमद पैगंबर यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता त्या मुळे रविवारी करून ईद -ए-मिलादुनन्नबी महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जुलूस मिरवणूक काढण्यात आली
*हजरत महंमद पैगंबर कन्यारत्न योजनेचा अनोखा उपक्रम साजरा*
हजरत महंमद पैगंबर जयंती उत्सव डीजेच्या कर्कश आवाजात साजरी न करता कळंब शहर तसेच परिसरातील सर्व धर्मीय अनाथ व आर्थिक परिस्थिती बेताच्या असलेल्या कुटुंबातील मुलींच्या नावाने बँकेत मुदत ठेव (FD) योजनेमध्ये पैसे टाकण्याचा कौतुकास्पद उपक्रम कळंब येथील दयावान प्रतिष्ठान व सरकार ग्रुप ने साकारला यावेळी 15 मुलींच्या नावे प्रत्येकी 7500/- रुपये भविष्य निर्वाहासाठी बॅंकेत मुदत ठेव करण्यात आली
जुलूस मिरवणूकीत चोख बंदोबस्त
धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप यांच्या नेतृत्वाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर ,गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे,पिंगलवाड महिला पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव,पोलिस हवालदार राऊत,पोलीस हवालदार शेंदारकर, पोलिस नाईक अजिज शेख, अभिजित देशमुख, दत्तात्रय शिंदे, मनोज दळवी, , पोलीस कॉन्स्टेबल रवी कोरे, सुरज गायकवाड,अमोल माळी, सुनील तारळकर, आसाराम खाडे, किरण माळी, साईनाथ आशमोड, अमोल फत्तेपुरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल वाघमारे, आदी ने चोख बंदोबस्त केला