Views


*२६ नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिन या दिवशी कळंब शहरातील अनेक शासकीय कार्यालय बंद*

*संविधान दिन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ*

*तहसीलदार सह चौकशी समितीने राजीनामे द्यावेत*

*तहसीलदार यांनी दिलेल्या त्या आदेशाला जवळपास १० महिने पुर्ण होत आले परंतू कळंब तहसीलदार कडून चौकशी पुर्ण होत नाही.*



कळंब/ प्रतिनिधी 


भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून २०१५ मध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा करण्यात आला. केंद्र शासनाने अर्ध शासकीय पत्रांन्वये राज्य शासनास २६ नोव्हेंबर "संविधान दिनी" संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सर्व शासकीय कार्यालयात करण्यात यावे असे आदेश दिले होते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन परिपत्रक काढून २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून दरवर्षी साजरा करावा असे सूचित केले होते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन परिपत्रक काढून "संविधान दिन" साजरा करण्याचे आदेश दिले होते.
          परंतु २६ नोव्हेंबर संविधान दिन या दिवशी कळंब शहरातील अनेक शासकीय कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले होते. याविषयी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी बंद कार्यालयांचे फोटो काढून संबंधित कार्यालय प्रमुख विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी कळंब तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली समिती नेमून संविधान दिन साजरा न करणाऱ्या कार्यालयांच्या नावा सह ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला जवळपास १० महिने पुर्ण होत आले परंतू कळंब तहसीलदार कडून चौकशी पुर्ण होत नाही. याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी तहसील कार्यालय कळंब येथे तहसीलदार सह चौकशी समितीने राजीनामे द्यावेत यामागणी साठी धरणे
आंदोलन केले.

 
Top