Views


*गुड टच -बॅड टच विषयी कायदा व मुलींची छेड छाड होऊ नये म्हणून पिंक पथक जागृत आहे --आरती जाधव महिला पोलिस उपनिरीक्षक*



कळंब/प्रतिनिधी 



पिंक पथक उपविभाग कळंब यांच्या वतीने शहरातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थीनींना व महिला कर्मचारी यांचे भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत चौकशी करण्यात आली व त्यानंतर धीर देत पोलिस प्रशासन व पिंक पथक विद्यार्थीनी व महिलांन सोबत आहे असा आधार दिला.
शहरातील व परिसरातील वाढत चालेली गुन्हेगारी व छेडछाडचे प्रकाराचे गांभीर्याने लक्ष देत कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालया कडून व पिंक पथकाच्या वतीने महिला पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव ह्या स्वतः कळंब तालुक्यातील व परगावा वरून शिक्षणासाठी शहरात प्रवास करून शहरात ये-जा करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीं व शाळेतील विद्यार्थीनीं ची शनिवार (दि 24) रोजी सकाळी 11:00 वाजता कळंब बसस्थानकात, येऊ त्यांच्या सोबत चर्चा करून संवाद साधला यावेळी पिंक पथक चे पोलिस नाईक वैजनाथ मोहीते सोबत होते यावेळी महिला व शाळेतील विद्यार्थीनीं गुन्ह्या बाबत मार्गदर्शन केले व सोशल मीडिया बाबत सतर्कता, गुड टच बॅड टच, महिला विषयी चा कायदा, तसेच पोस्को विषय कायदा बाबत माहिती दिली अडचणी काळात पोलिस त्यांना कशी संरक्षण करु शकतात त्या बदल माहिती दिली अडचणी काळात विद्यार्थीनींने व महिलांनी 80074 57000 पिंक पथक चा मोबाईल नंबर आहे व टोल फ्री क्रमांक 112 हा कायम लक्षात ठेवावे आणि अडचणी काळात संपर्क करावे तत्काळ पोलिस पथक तुमच्या पर्यंत पोहचून तुम्हाला संरक्षण करु शकले


चौकट 


विद्यार्थीनींनी व महिलांनी 80074 57000 पिंक पथक चा मोबाईल नंबर आहे तसेच टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क केल्यास पोलिसांना तुमची तत्काळ मदत करता येईल महाविद्यालयीन व शाळेयीन विद्यार्थीनींनी तसेच मुलींनी व महिलांनी निर्भीडपणे समोर येत आपली तक्रार किंवा अडचणी पिंक पथकाकडे किंवा पोलिस ठाण्यात करावी

आरती जाधव 
महिला पोलिस उपनिरीक्षक पिंक पथक प्रमुख 
पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब 






*गुड टच -बॅड टच विषयी कायदा व मुलींची छेड छाड होऊ नये म्हणून पिंक पथक तत्पर आहे कळंब बसस्थानकात विद्यार्थ्यांनी व महिलांशी संवाद साधत असतांना पिंक पथक प्रमुख माहिला पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव*


 
Top