Views


*राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवून वाहनातील डिझेल चोरी करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात* 


*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका सह धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या पथकाची कामगिरी* 



धाराशिव /प्रतिनिधी 


धाराशिव शहरात व तुळजापूर शहर परिसरात रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहने थांबवून चाकूचा धाक दाखवून वाहनातील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पाठलाग करून एकास धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी 
कंटेनर गाडी क्र एमएच 44 यु 9817 ही बावी शिवारातील तुळजाई पेट्रोल पंपाचे समोर रोडवर लावून झोपले असता अनोळखी पाच व्यक्तीने बुधवार (दि. 19.) रोजी मध्यरात्री 01.40 वा. सु. सुदाम मोराळे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन गाडीतील अंदाजे 7280 ₹ किंमतीचे गाडीतले डिझेल व रोख रक्कम 2,000 ₹ असा एकुण 9,280 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी
धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुरंन 206/2024 भा.द.वि.सं. कलम 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं 159/2024 भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुरनं 272/2024 भा.द.वि.सं. कलम 394 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुरनं 265/2024 भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहेत.
    
    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पथक गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने आवश्यकत्या साहित्यासह पेट्रोलींग करत धाराशिव उपविभाग रवाना होवून बावी आश्रम शाळा येथे पथक अले असता पथकास गुप्‍त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक फिक्कट सोनेरी रंगाची बोलेरो गाडी ज्यामध्ये पाच ते सहा इसम दरोडा टाकून मोहा ते कळंब कडे तेर मार्गे जात आहेत अशी तांत्रिक विशलेषनावरुन खात्रीशीर महिती मिळाल्याने 

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके हे पोलिस हवालदार माचेवाड, तसेच पोस्टे ढोकी येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक सातपुते, पोलिस नाईक क्षिरसागर पोलिस काॅन्सटेबल गोडगे यांचे पथक हे मिळालेल्या माहितीनुसार बोलेरोचा पाठलाग केला असता कळंब तालुक्यातील मोहा शिवारात मिळालेल्या वर्णनची बोलेरो पथकास दिसून आली तीस थांबवण्याचा प्रयत्न केला असता बोलेरो गाडी ही न थांबता मोहा पारधी पीढी जवळ थांबली त्यामधील पाच इसम पळून जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी एकास पथकाने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी उर्फ पुण्या आप्पा शिंदे, (वय 37), रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सागिंतले की, मी व माझे इतर चार साथीदार यांनी नमुद गुन्हे केल्याचे कबुली दिली. यावरुन पथकाने त्याच्या ताब्यातुन अंदाजे 5,36,000₹ किंमतीचे डिझेलचे प्लॅस्टीकचे केन्डे, मोबाईल फोन, लोखंडी रॉड, एक लोखंडी चाकू बांगडी पाईप, बोलेरो गाडी असा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.

      सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, सहायक पोलीस उपनिरीक्षक वल्लीवुल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी ,कोळी, ,माचेवाड, तसेच पोस्टे ढोकी येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक सातपुते, पोलिस नाईक क्षिरसागर पोलिस काॅन्सटेबल गोडगे यांच्या पथकाने केली आहे
 
Top