Views


*अवैध कत्तलखान्यावर पोलिसांची धाड*

*1 पिक 2 टमटम सह टनभर मटन व गोवंश जनावरे असे एकूण 17,42,000/- रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


परंडा शहरातील कसबा गल्ली दर्गा रोड परंडा येथील महंमद हुसेन कुरेशी यांच्या मालकीच्या घराच्या बाजुला कंपाउड मध्ये पत्रयाचे गेट बंद करुन अवैधरित्या कत्तलखाना चालवित असल्याची अशी गोपनीय माहिती मिळालेल्या ठिकाणी कळंब उपविभागाचे पथक व पोलीस ठाणे कळंब, पोलीस ठाणे येरमाळा येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना कसबा गल्ली दर्गा रोड परंडा या ठिकाणी शुक्रवार(दिनांक 21)रोजी वा छापा मारले 

 कसबा गल्ली दर्गा रोड परंडा येथील महंमद हुसेन कुरेशी यांच्या मालकीच्या घराच्या बाजुला कंपाउड मध्ये पत्रयाचे गेट बंद करुन अवैधरित्या कत्तलखान्यात 940 किलो गोवंश मांस कि. 2,06,800/- रु. 102 पिकअप, 02 टमटम, 01 मोटार सायकल असे 05 वाहने कि. अ. 14,05,000/- रु, 07 गोवंश जनावरे कि.अ.1,18,000/- रु. वजन काटे, सुऱ्या, सतुर कि.अ.12,900/- रु इत्यादी वर्णनाचे 17,42,700/- रु चा मुददेमाल मिळुन आले. 1) जागा मालक महंमद हुसेन कुरेशी 2 ) आलिशान हरुन कुरेशी रा. परंडा 3) नवाज खाजा कुरेशी रा. परंडा व 02 अज्ञात इसम असे एकुण 05 इसमा विरुध्द कलम 429,34 भादवि सह कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (क), 9,9 (अ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा पोलीस ठाणे परंडा येथे दाखल करण्यात आले आहे.

  ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या सूचनेनुसार कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री पुजरवाड, श्री रामहरी चाटे, पोना सादीक शेख, पोना कांबळे, नवनाथ खांडेकर, शाहरुकखा पठाण, श्रीकांत भांगे, विक्रम पतंगे, अमोल जाधव, रवि कोरे, कमलाकर सुरवसे, गुळमे, खाडे, गायकवाड यांनी कार्यवाही केली 

 
Top