*पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.*
कळंब/ प्रतिनिधी
तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची यात्रा नुकतीच पार पडली असून यात्रा काळात मंदिर परिसरात झालेला कचरा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसरात रविवार (ता.१६) रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
श्रीक्षेत्र येरमाळा येथे ६ ते ११ एप्रिल दरम्यान संपन्न झालेल्या श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक दर्शना करीता आले होते.यात्रा कालावधीत आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरत मोठ्या प्रमाणात घनकचरा इतरत्र पडलेला होता.घनकचऱ्यापासुन रोगराई पसरु नये तसेच मंदिर परिसर स्वच्छ व्हावा या संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे पुढाकार घेवुन मौजे येरमाळा (ता.कळंब) येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर परीसरात ( ता.१६ ) रोजी सकाळी ६ ते ११ वाजे दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सदरील स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनाला आर्ट ऑफ लिव्हींग,संत निरंकारी मिशन, येडाई व्यसनमुक्ती केंद्र,येडेश्वरी ट्रस्ट व ग्रामपंचायत येरमाळा यांनी भरभरुन प्रतिसाद देवून यांचे संयुक्त विद्यमाने २० ट्रॅक्टर घनकचरा संकलीत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक यांच्या या संकल्पनेचे येरमाळा ग्रामस्थ, भाविकांनी कौतुक केले.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वच्छता अभियानात सहभागी आर्ट ऑफ लिव्हींग,संत निरंकारी मिशन,येडाई व्यसनमुक्ती केंद्र,येडेश्वरी ट्रस्ट,ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांचे आभारव्यक्त करुन पुढेही पोलीस विभागा कडुन राबविण्यात येणारे विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.