Views


*येरमाळा येथे ८,८३,७७१/- रूपयाचे अवैध गुटखा जप्त* 

कळंब/ प्रतिनिधी 

तालुक्यातील येरमाळा येथे राज्य शासनाने प्रतिबंध केलेले ८,८३,७७१/- रुपयांचे गुटखा पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येरमाळा येथील येडेश्वरी किरणा दुकानात, घरामध्ये, गोडाऊन मध्ये सोमवार (दि.२४) रोजी रात्री पोलिसांनी छापा मारत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेले गुटखा, सुगंधित तंबाखू पानमसाला चे साठा करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची खात्री करत पोलिसांनी बाबा कलेक्शन च्या बाजूस असलेल्या किराणा दुकानात व येडेश्वरी किरणा दुकानात, राहत असलेले घरा मध्ये, व गोडाऊन मध्ये छापा मारुन गुटखा, सुंगधित पानमसाला, तंबाखू, चे अवैध साठा करून ठेवले पोलिसांनी जप्त केला या कार्यवाही नामदेव पारवे, दत्तात्रय नारायण रणसिंगे दोघे रा. येरमाळा यांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हा दाखल करण्यात आले

सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड, पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडे, पोलिस नाईक नवनाथ खांडेकर , किरण अंभोरे, अमोल राऊत, चालक राऊत, विशाल गायकवाड, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल तस्लिम चोपदार, प्रगती देशपांडे, पुष्पा देशमुख, आदिनी केली 
 
Top