Views


*१३,३०,४१०/ रुपये किंमतीचाअवैध गावठी हातभट्टी दारू व रासायन जप्त*


*२७ जणांना विरुध्द ढोकी पोलीस ठाण्यात ०२ गुन्हे दाखल*
  

* हातभट्टी दारू चे अड्डे उध्वस्त*

*उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांची एका आठवड्यात सलग तिसऱ्या कार्यवाही* 


उस्मानाबाद/प्रतिनिधी

तालुक्यातील तावरजखेडा येथील तांडा आणि जागजी येथील तांडा हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू चे मोठ्या प्रमाणात तयार करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांना मिळाली यांची दखल घेत रविवार ( दि.२३) रोजी पहाटे ५:०० वाजता कळंब पोलिस व ढोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी चे पथक तयार करून 

तावरजखेडा तांडा येथे छापा मारुन १) शितल अनिल राठोड, २) हिरा वसंत राठोड, ३) वसंत लालसिंग राठोड, ४) अशोदा वसंत राठोड, ५) अनिता मोहन राठोड, ६) पुजा किरण राठोड, ७) विजय मधुकर पवार, ८) विमल विनायक पवार, ९) राजेंद्र लाला राठोड, १०) शांताबाई राजेंद्र राठोड, ११) नंदकुमार विनायक राठोड, १२) सुरेश उमाजी पवार, १३) सुधाकर केशव राठोड, १४) शंकर बालाजी चव्हाण सर्व रा. तावरजखेडा यांचे ताब्यातून गावटी हात भटटी दारु बनवण्यासाठी लागणारे आंबट उग्रवास येत असलेले फसफसते गुळ, नवसागर व इतर पदार्थ मिश्रीत रसायन एकुण १०४०० लिटर किंमत अंदाजे ६० रु. प्रति लिटर प्रमाणे ६,२४,०००/- रूपये किंमतीचे आंबट उग्रवास येत असलेली गा.ह.भ.दारु १०० लिटर प्रति लिटर अंदाजे ६० रुपये प्रमाणे ६०००/- रुपये व रसायन तयार करण्यासाठी लागणारा गुळ ७१५ किलो प्रति ४० रु. किलो प्रमाणे २८६००/- रुपये असा एकुण ६,५८,६०० /- रुपयेचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले 
      जागजी तांडा येथे छापा मारून १) व्यंकट पांडुरंग आडे, २) अर्चना उध्दव चव्हाण, ३) गोपीनाथ पांडुरंग आडे, ४) बंका पांडुरंग आडे, ५) शांताबाई बाळु जाधव, ६) उत्तम राठोड, ७) कविता पिंटु राठोड, ८) बालाजी आडे, ९) लखन रंगनाथ आडे, १०) रेखा रामदास आडे, ११) भिमा रुपा राठोड, १२) शहाजी गोविंद आडे, १३) इतर एक यांचे ताब्यातुन ताब्यातुन गावटी हात भटटी दारु बनवण्यासाठी लागणारे आंबट उप्रवास येत असलेले फसफसते गुळ, नवसागर व इतर पदार्थ मिश्रीत रसायन एकुण १०६२० लिटर किंमत अंदाजे ६० /- रु. प्रति लिटर प्रमाणे अंदाजे किंमत ६,३७,२००/-, आंबट उग्रवास येत असलेली गा.ह. भ. दारु १८० लिटर प्रति लिटर अंदाजे ८०/- अंदाजे किंमत १४,४०,०००/-रुपये व रसायन तयार करण्यासाठी लागणारा नवसागर ७५ किलो प्रति २६०/- रु. किलो प्रमाणे १९५००/- रुपये असा एकुण ६,७१,८१०००/- रुपयेचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले. दोन्ही गावातील छापा मध्ये एकुण १३,३०,४१०/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तो जप्त करुन एकूण २७ इसमा विरुध्द महाराष्ट्र दारु बंदी कायदा प्रमाणे कायदेशिर पोलीस स्टेशन ढोकी येथे ०२ गुन्हे दाखल करण्यात आलेले

सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जगदीश राऊत, पोलिस उपनिरीक्षक श्री. पुजरवाड, पोलिस उपनिरीक्षक श्री. मालुसरे, पोलिस उपनिरीक्षक श्री. रामहरी चाटे, पोहेकाॅ. गव्हाणे, पोहेकाॅ. राजेश शेळके, पोहेकाॅ. बाबा उंबरे, पोना. श्रीमंत क्षीरसागर, पोना . गोविंद खोकले, पोना .भांगे, महिला पोलिस नाईक . प्रतिभा मते, पोकाॅ. नवनाथ खांडेकर, पोकाॅ. किरण अंभोरे, पोकाॅ .किरण भांगे, पोकाॅ. भगवान मंदमुले, पोकाॅ. महेश शिंदे, पोकाॅ. दत्तात्रय थाटकर, पोकाॅ. ढेकणे, पोकाॅ. पानढवळे, पोकाॅ. निलकंठ गवळी, मपोकाॅ. पुजा स्वामी, मपोकाॅ. आरती मोरे यांनी केली 












 
Top