Views

*ग्रामपंचायत सदस्य एकापेक्षा अधिक जागांवर निवडून आल्यास*
*एक जागा सोडून अन्य जागांचा मुदतीत राजीनामा द्यावा : अविनाश कोरडे*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 13अ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये जे सदस्य एकापेक्षा अधिक जागावर निवडून आलेले असतात अशा प्रकरणी, निवडणूक निकाल प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसांत एका जागेचा राजीनामा अशा ग्रामपंचायत सदस्याने देणे आवश्यक आहे.
                उस्मानाबाद जिल्हयातील 166 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये एका पेक्षा अधिक जागेवर निवडून आलेल्या सदस्याने एका जागेव्यतिरिक्त अन्य जागाचा राजीनामा निवडणूकीचा निकाल दि.23 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करावा, असे आवाहन सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी केले आहे.
                     
 
Top