Views


*मोहेकर महाविद्यालयाचे घवघवीत यश*


कळंब/प्रतिनिधी 


डॉ. बा. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. व्यंकटेश महाजन सीनियर कॉलेज उस्मानाबाद यांच्या विद्यमाने आयोजित इंटर कॉलेज अटलांटिक्स टूर्नामेंट मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामधील बी. एस्सी.द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. निकिता संभाजी वायकर हिने लांब उडी व १०० मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवलेला आहे तसेच बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकत असलेली कु.करडे ऐश्वर्या हिने गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक तर लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक व सिल्वर मेडल मिळवले त्यांच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार , क्रीडाशिक्षक उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, प्रा.सरस्वती वायभसे व श्री हनुमंत जाधव , अरविंद शिंदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील विद्यापीठात होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top