Views
*तरुणांनी उद्योजक होणे काळाची गरज-सनदी लेखापाल मोसिन शेख*


*मोहेकर महाविद्यालयामध्ये वाणिज्य मंडळाचे उद्घाटन.*


कळंब/प्रतिनिधी 

दि.०७ शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागातर्फे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विट भट्टीवर काम करून खूप कष्टातून आपले शिक्षण पूर्ण करणारे व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्रोत सनदी लेखापाल मोसिन शेख लाभले होते. त्यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना संवाद साधत मार्गदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले,"की आज सर्वत्र मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी विविध कौशल्य अंगीकृत असणे आवश्यक आहे. तरुणांनी उद्योजक होणे ही काळाची गरज आहे .अनेकांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची संधी विकसित होत आहे परंतु यासाठी नितांत प्रयत्न करणे आवश्यक आहे."
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजन आणि वृक्षाला पाणी घालून करण्यात आली.गौरी गुजर व पूजा बांगर यांनी पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन केले.याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोकराव मोहेकर, डॉ. नागनाथ अदाटे, डॉ. संजय सावंत,प्रा.बाळासाहेब खोसे, प्रा. तांबोळी उपस्थित होते.वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष रेणुका दीक्षित, उपाध्यक्ष प्रेरणा वेदपाठक,सचिव धनराज खापे, कोषाध्यक्ष ओमकार तोंडकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव मोहेकर म्हणाले की, "आज शिक्षण संस्कार आणि कौशल्यांना महत्त्व प्राप्त आहे, वाणिज्य शाखेतील येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर यश तुमचेच आहे. त्यानिमित्ताने विविध यशस्वी उद्योगाची उदाहरणे ऐकून स्पष्ट केले अशक्य असे काहीच नाही विद्यार्थी क्षेत्रातील ज्ञान मिळवून गुणवंत व किर्तीवंत होऊ शकतात."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वरी पाटील व प्रेरणा लोमटे यांनी केले प्रास्ताविक संजय सावंत यांनी केले पाहुण्यांचा परिचय तांबोळी सर यांनी दिला तर आभार प्रदर्शन हे गायत्री वाघमारे यांनी केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top