Views








*विठ्ठल आमचा पाठीराखाच्या मालीकेच्या शुटिंगला सुरुवात*
 
कळंब/प्रतिनिधी 

कळंब तालूका वा ऊस्मानाबाद जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीला बळकटी देत ग्रामीण भागातील सर्व कलाकारांना संधी प्राप्त करुन देत, निर्माण होत असलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारधारेवर आधारीत दिव्या एन्टर्टेनमेंट अँड अॕडव्हर्टायझिंग कळंब निर्मीत
विठ्ठल आमचा पाठीराखा 
 या टि व्ही मालिकेच्या शुटींगला रविवार दि.९-१० २०२२ रोजी सुरूवात झाली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अंनिस राज्य कार्याध्यक्ष मा.माधव बावगे सर, तर अध्यक्ष म्हणून मा.अशोकदादा मोहेकर,अॕड. तानाजी चौधरी, प्रा.डाॕ बाळकृष्ण भवर, अशोकराव चोंदे,अतुलभैय्या गायकवाड, प्रा.जगदिश गवळी, अरविंद शिंदे सर अॕड.शकुंतला फाटक , ज्योती सपाटेताई , बाबूराव जाधव , शिवाजी गिड्डे यांच्या उपस्थित क्लॕपींग देउन या सिरीयलचा मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या निमित्ताने मालिकेत सहभागी होण्यासाठी अनेक नवोदित व अनुभवी इच्छूक कलाकारांची विनामुल्य नोंदणी करण्यात आली ,त्या बरोबरच आशिष झाडके, मानसी वाघमारे , रेणूका बावत व इतर कलाकारांचा विवीधगुण दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शरद अडसूळ यांचे बासरी वादन झाले.या प्रसंगी या मालीकेचे दिग्दर्शक सिद्धार्थ उर्फ विलासराव कांबळे, निर्मात्या पौर्णिमा कांबळे, सीमा कवडे, मालिकेत प्रमुख कलाकार हभप बळीराम कवडे महाराज , सवीता मालुरे, अश्विनी मिरगणे,राणी लोमटे, भक्ती वरपे , सिद्धार्थ कांबळे, प्रकाश गिरी, विलास गंधुरे सुनिल गायकवाड, दत्ता भांडे, कवी सुरेश कांबळे इत्यादी कलाकारांसोबतच 
विवीध भागातून मुले मुली स्री पुरूष,भजन , गीत गायक, गायीका , वादक , अभिनेत्री अभिनेते, नृत्य, साहित्यीक , लेखक ,कवी चित्रकार, नाट्य कलावंत, महिला व पुरूष भजनी मंडळ , अनेक कलाकारांनी हजेरी लावली
अंनिसच्या माध्यमातून हि मालीका महाराष्ट्रात पोचवण्याचे अश्वासन माधव बावगे सर यांनी दिले तर संत तुकाराम महाराजांचा विद्रोही विचार घरोघरी पोचवण्यासाठीच या मालीकेची निर्मीती करीत असल्याचे मत दिग्दर्शक सिद्धार्थ कांबळे यांनी बोलून दाखविले.
प्रसंगी सर्व मान्यवरांची भाषणे झाली.सादरीकरण करत असताना मालिकेचे प्रमुख कलाकार ह भ प बळीराम कवडे यांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणवा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर केला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी व आभार प्रदर्शन अरविंद शिंदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघरत्न कसबे, शरद अडसूळ,अमित कांबळे,सर्वेश, फैय्याजभाई, व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

 
Top