Views


*नूतन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी स्वीकारला पदभार*

उस्मानाबाद/प्रतिनिधी 


 उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज दि.30 सप्टेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला आहे. डॉ.ओम्बासे हे यापूर्वी वर्धा येथे जि.प.चे मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत होते. दि.29 सप्टेंबर 2022 च्या महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या आदेशानुसार श्री.ओम्बासे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. 
यावेळी नुतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत अधिकाऱ्यामार्फत करण्यात आले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे आदी अधिकारी उपस्थित होते. डॉ. ओम्बासे हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्ती आहे. 

 
Top