Views


*तुळजापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात*
                              

उस्मानाबाद/प्रतिनिधी


सातव्या वेतन आयोगा प्रमाणे सुधारणा करण्यासाठी तुळजापूर येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून ला 3000/- रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

       तक्रारदार यांची सातव्या वेतन आयोगा प्रमाणे झालेली वेतन निश्चिती ही चुकीची झाली असल्याने सदरची सुधारित वेतन निश्चिती करून दिल्याचा मोबदला म्हणून यातील लोकसेवक चंद्रकांत माणिकराव गोरे, वय 47 वर्षे,पद :- अव्वल कारकून , तहसील कार्यालय तुळजापूर, ज़ि. उस्मानाबाद (वर्ग-3) तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष दिनांक 04.08.2022 रोजी 3000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून दिनांक 08.08.2022 रोजी 3000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली.

  सदर कार्यवाही ही मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.व मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद,विकास राठोड,पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद
 पोलीस अंमलदार मधुकर जाधव , अर्जुन मारकड, सचिन शेवाळे,विशाल डोके ,विष्णू बेळे चालक दत्तात्रय करडे यांनी कार्यवाही केली.



*उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*


प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100

श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397

विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879
 
Top