Views


*निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीत
2 ते 5 ऑगस्ट दारुबंदी आदेश* 

उस्मानाबाद/प्रतिनिधी 


  जिल्हयात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या गावात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मतदान आणि मतमोजणी शांतेत निर्भय तसेच नि:पक्षपाती पध्दतीने पार पाडण्याकरिता जिल्हयातील निवडणूक होत असलेल्या गावातील दारू दुकाने 2ते 5 ऑगस्ट दरम्यान बंद असतील, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत . उत्पादन शुल्क विभागाची अनुज्ञप्ती कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान होत असून त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर मद्य विक्री करण्यास मनाई/कोरडा दिवस म्हणजे दि.2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते दि.4ऑगस्ट 2022 रोजीचा मतदानाचा संपूर्ण दिवस तसेच दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होणार असल्याने (मतमोजणी आणि निकाल घोषित करण्याचा दिनांक)(मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चीत करतील त्यानुसार राहील) मतमोजणी संपेपर्यंत सर्व प्रकारचे घाऊक तसेच किरकोळ मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे व त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश श्री . दिवेगावकर यांनी दिले आहेत.
 
Top