Views


                
  *अग्नीपथ योजनेअंतर्गत राहुरी येथे*


   *सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन*
        
  उस्मानाबाद/प्रतिनिधी 


     
अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर जिल्हयातील सर्व होतकरु सुशिक्षीत अविवाहित तरुणांसाठी अग्नीपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन दि. २३ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत करण्यात येणार असल्याबाबत पुणे येथील भरती कार्यालय, यांनी कळविले आहे. भरतीचे ठिकाण अहमदनगर जिल्हयातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आहे. 
          या भरती मेळाव्यामध्ये अग्नीवीर जनरल डयुटी (शिक्षण इयत्ता दहावी ४५ टक्के पास), ट्रेडसमॅन (शिक्षण फक्त इयत्ता दहावी पास), ट्रेडसमॅन (Syce, Housekeeper & Messkeeper) साठी इयत्ता आठवी पास, टेक्नीकल (शिक्षण इयत्ता १०+०२/ITI & NIOS course of mi) व क्लार्क / स्टोअर किपर टेक्नीकल/इन्वेटंरी मॅनेजमेंट या पदासाठी होणार आहे. सर्व पदासाठी वयोमर्यादा दि.०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००५ या कालावधीत (दोन्ही तारखासह)जन्मलेले असावेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर लॉगइन करुन ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३१ जुलै २०२२ आहे. दि.३१ जुलै २०२२ पासुन ई-मेल व्दारे अॅडमिट कार्ड पाठविण्यात येणार आहेत. त्याची प्रिंट काढून सोबत भरतीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस आणि वेळेत संबंधित उमेदवारांनी पोहचणे आवश्यक आहे. 
     माजी सैनिकांच्या पाल्यासाठी उंची (२ सें.मी.). छाती (१ सें.मी.), वजन (१ कि.) ची सवलत असणार आहे त्याचप्रमाणे नॅशनल/राज्य आदी स्तरावर विशेष प्रावीण असलेल्या खेळाडुसाठी उंची, छाती आणि वजनामध्ये सवलत लागू आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी स्वतःचे वीस कलर पासपोर्ट साईज फोटो पांढरा बॅकग्राऊंड असावे. मूळ मार्क मेमो, सनद आदी एनसीसी प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, तहसीलदार यांच्या सहीनिशी), जातीचा दाखला, कॅरेक्टर सर्टीफिकेट, अविवाहीत दाखला, खेळाडुंसाठी विशेष प्रावीण असलेबाबतचे प्रमाणपत्र, ॲफीडेव्हीट (नमुन्याप्रमाणे) माजी सैनिकांसाठी रिलेशन सर्टीफिकेट व १८ वर्षाच्या खालील उमेदवारासाठी पालकाकडून कन्सेंट फॉर्म, सिंगल बँक पासबूक, आधार कार्ड, कार्ड आणि कोरोना डोस घेतलेबाबतचे प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. ०१ ऑक्टोबर -२०२२ ही वयोमर्यादा गणणा करण्याची तारीख असेल. 
     भरतीच्या ठिकाणी उमेदवारास रात्री ००१५ वा. पासून ते ०६०० वा. पर्यंत प्रवेश देण्यात येईल. तेव्हा उस्मानाबाद जिल्हयातील जास्तीत जास्त तरुणांनी यासंधीचा लाभ घ्यावा, व्यतिरिक्त आधिक माहिती व ॲफीडेव्हीटचा नमुना इत्यादी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (नि.) यांनी कळविली आहे.
                                   ******
 
Top