Views


*स्थानिक गुन्हे शाखेने ६९,९२,०००/- रुपयांचा गुटखा केला जप्त*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

तालुक्यातील कोंड परिसरात अवैध गुटखा विक्री चा गोरख धंदा चालू असल्याची माहिती उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेस गुप्त माहिती वरुन छापा मारून एक आयसर टेंम्पो, एक महिंद्रा कंपनेचे पिक अप व गोडावून मधून ६९,९२,०००/- रुपयांचा गुटखा जप्त केला

याबाबत सविस्तर वृत्त असे की उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंड परिसरात महालिंग नागु कोरे (वय.६२) रा. कोंड हे अवैध गुटखा विक्री करत असल्याची माहिती उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेस गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने याची खात्री करत. सदर ठिकाणी छापा मारून आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता एक आयसर टेंम्पो, एक महिंद्रा कंपनेचे पिक अप व गोडावून मधील महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा असा एकूण ६९,९२,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कलम ३२८,२७२, २७३,१८८ भादवि प्रमाणे ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला
     सदर कार्यवाही उस्मानाबाद पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोहेकाॅ. निंबाळकर,पोहेकाॅ. काझी, पोहेकाॅ. औताडे, पोहेकाॅ.जानराव, पोना.पठाण , कवडे, काकडे,जाधवर,मपोना.टेळे , चालक पोहेकाॅ. अरब, कवडे,चौरे यांनी केली 
 
Top