Views*श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळा*"श्री गजानन महाराज पालखीचे कळंब मध्ये स्वागत करताना सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपविभगिय अधिकारी अहिल्या गाठाळ व पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आदी.*
कळब/प्रतिनिधी


 हरी नामाचा गजर करत , विठ्ठलाचे अभंग गात पंढरपूर कडे निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजाच्या पालखीचे सोमवार ता. २७ रोजी कळंब शहरात आगमन होताच बीड ,उंस्मानाबाद जिल्हा सरहदीवर मांजरा नदी तिरावर प्रथमत: पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलिस अधीक्षक एन. रमेश , महसूल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ यांनी सायंकाळी पाच वाजता गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करून पूजन करण्यात आले . 

 या प्रसंगी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव , नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक दीपक हारकर यांच्यासह शहरातील नागरिक व्यापारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या पालखीच्या आगमनाने शहराला पंढरीचे रूप आले होते. सोमवार ता.. २७ पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. सायंकाळी शहरातून ही मिरवणूक निघाली. दरवर्षी शेगांव येथील गजानन महाराजांची दिंडी पंढरपूर कडे जाताना कळंब मध्ये मुक्काम राहतो. त्यानंतर ही दिंडी परळी रोड, शिवाजी चौक,होळकर चौक ,नगर परिषद शाळा क्र.१ च्या मैदानात ही मिरवणूक पोहचली.

श्रीची आरती होऊन करंजकर परिवाराच्या वातिने वारकऱ्याना रात्रीच्या भोजना ची व्यवस्था करन्यात आली होती . संत श्रेष्ठ गजानन महाराज यांनी केले त्या गजानन महाराज संस्थान पालखी सोहळा कळंब शहरात दाखल होतोय "गण गण गणात बोते" नाम संकीर्तन घेऊन जीवन पावन करून घ्यावेत तस पाहता कळंब शहरातील भाविक गजानन महाराज पालखीचे वाजत गाजत दरवर्षी स्वागत करतात. कारण शेगावीचे राजा संत श्रेष्ठ गजानन महाराज विठ्ठल भेटी साठी पायी चालत आहे पण सोबत हरिनाम स्मरण करत करत सकल संताना आलिंगन देऊन या संताकरवी सत्कार करून घेत निघालेत तुकोबाराय म्हणतात 
            उजळले भाग्य आता !
            अवघी चिंता वारली!
            संत दर्शनी हा लाभ! 
            पद्मलाभ जोडीला!!  

पावलांनी आता वेग घेतला आहे सावळ्या विठू राया ची ओढ दिवसें दिवस वाढत आहे. या वेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महामार्ग पोलीस, उस्मानाबाद येथून एक पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली होती.
ही दिंडी ६ जून रोजी शेगाव येथून निघाली होती. आज कळंब शहरातील तेविसवा मुक्काम होता.श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह ३ अश्व व १० वाहने आहेत. वारकऱ्यांकरीता अॅम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यांसह आहे. याव्दारे श्री च्या पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारक-यांकरीता औषधोपचार केल्या जातो. वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे ता.०८ जुलै ला पोहचेल. श्रींची पालखीच्या ठिकाणी रात्री कीतनांचा कार्यक्रम झाला. तरी भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. श्रींचे पायी पालखी सोहळ्याचे ५३ वे वर्ष आहे.श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुकामी श्री संस्थानच्या वतीने दशमी, एकादशी व व्दादशी (बारस) ला जवळपास ३ लाखाचे वर वारकरी भक्तांना महाप्रसाद मिष्टानासह वितरीत करण्यात येतो, संस्थेच्या नियमाप्रमाणे भजनी साहित्य जसे १० टाळजोड, विणा, मृदंग, हातोडी व संत साहित्य श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकाराम महाराज गाया दिल्या जाते. आजपावेतो महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, तेलगंणा या ९ राज्यातील ७६ जिल्हयांमध्ये आजरोजी १८,८४५ (अठरा हजार आठशे पंचेचाळीस) गावांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले आहे व अखंड ही सेवा सुरू आहे.

श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटणाऱ्या दिंड्यांमधील वारकन्यांना श्री संस्थेव्दारा कापड प्रसादाचे वितरण करण्यात येते. तसेच दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.

चौकट : 
श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करते.
 
Top