Views


*भारतीय स्टेट बँक, शाखा कळंब च्या वतीने विविध योजना संदर्भात मेळावा संपन्न*


कळंब/प्रतिनिधी 

भारतीय स्टेट बँक, शाखा कळंब च्या वतीने रविवार ता.१२ रोजी विविध योजना संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित ग्राहकांना भारतीय स्टेट बँकेच्या वतीने गृह कर्ज, वाहन कर्ज याविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय किफायतशीर व्याज दर, प्रोसेस फिस, महिलांसाठी व्याजदरामधे सवलत, दररोज कमी होणारी शिल्लक आदी विषायाविषयी सविस्तर माहिती दिली. 

यावेळी शाखाधिकारी सचिन ढोमे म्हणाले की, खातेदारांनी गरज असल्यास अशा विविध योजनांचा लाभ घ्यावा, थेट आमच्याशी संपर्क साधून माहिती सुधा घेता येईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी शाखाधिकारी सचिन ढोमे, ऋण अधिकारी सतीश सेंदुरसे, वसंत तीर्थे, मंगरूळ शाखेचे शाखाधिकारी शिवकुमार खुळे आदींसह बँकेचे कर्मचारी, शिक्षक, व इतर ग्राहक मोठ्या संख्येने उपसथित होते.
 
Top