Views


*तेरखडा हद्दीतील चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली एका तासात शोध घेऊन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या जाळ्यात*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी


     वाशी तालुक्यातील तेरखेडा येथून दि.25 रोजी भुषण भिमराव उंमरदंड रा.तेरखेडा ता.वाशी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 25 ए. डी. 1135 हा त्यांनी शेतामध्ये लावला होता. शेतामध्ये लावलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचे भुषण भिमराव उंमरदंड यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुरन.126/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची माहिती उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेस वर्ग करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने गतीने तपासचक्र फिरवत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळवत. गुन्ह्यातील आरोपी प्रकाश पांडुरंग मांडवकर रा.तेरखेडा ता. वाशी यांनी सदर ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरले असून ते गडदेवधरी येथे डोंगरांमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली असता त्यांने ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून लपवले असल्याचे कबूल करून ट्रॅक्टर लपवलेले ठिकाण दाखवले आरोपीस ट्रॅक्टर ट्रॉलीसह येरमाळा पोलिस यांच्या ताब्यात देण्यात आले अन्य आरोपीचा शोध करण्यात येत आहे.

सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलिस अधीक्षक श्री. नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर,शैलेश पावर, पोलीस नाईक शौकत पठाण, वलीऊल्ला काझी, विनोद जानराव,बलदेव ठाकूर चालक धनंजय कवडे यांनी केली. 
 
Top