*लाचलुचपत विभागाचे कारवाई येथील नायब तहसीलदार अटकेत*
उस्मानाबाद /प्रतिनिधी
भूम तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पंडीत रामराव राठोड यांना ५०००/- रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.०७) रोजी दुपारी कार्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या दोन रास्त भाव दुकानांचे तपासणी फॉर्म भरून घेऊन त्यात विनात्रुटी अहवाल वरिष्ठांना पाठविला व त्याचा मोबदला म्हणून पंचा समक्ष प्रथम 6000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व 5000/- रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली.या वेळी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राठोड यांना रंगेहाथ पकडले.सदरची कार्यवाही ही
लाचलुचपत विभागाचे .औरंगाबाद पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मा.श्री.विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे उस्मानाबादचे उपाधिक्षक प्रशांत संपते पो.ना दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, विशाल डोके यांनी करून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.
*( कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद फोन नंबर 02472 222879 वर किंवा प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद मो.नं.95279 43100 वर संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे)*