Views


*महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ जिल्हा-उस्मानाबाद या जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी जाहीर*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ जिल्हा-उस्मानाबाद या जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी ता. ४ जानेवारी २०२२ रोजीच्या सर्वसाधारण सभेनुसार खालीलप्रमाणे सन २०२२ ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीसाठी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी महासंघाचे मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, महासंघ प्रतिनिधी तथा माजी जिल्हा सचिव बाबुराव बिरादार अन्य सर्व जिल्हा प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

 जिल्हाध्यक्ष विक्रम दळवी तर कार्याध्यक्ष पदी अरुण माडेकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी रामलिंग मारकड, शिवराज औसेकर, चंद्रकांत पवार असून जिल्हा सचिव कविराज रेड्डी, सहसचिव पदी गोविंद पाटील, वैजिनाथ चौधरी , कोषाध्यक्ष पदी वैभव चव्हाण , संघटनमंत्री मधुकर शेटे, हिशोब तपासणीस ज्ञानेश्वर दासमे,श्रीम.विजया पाटील-महिला प्रतिनिधी, श्रीकांत दीक्षित-शिक्षकेत्तर प्रतिनिधी, कृष्णा राऊत-मुख्याध्यापक प्रतिनिधी, प्रसिद्धी प्रमुख रमेश अंबिरकर.यांची निवड करण्यात आली आहे. 
कार्यकारणी सदस्य, व्यंकट बिराजदार, हरिश्चंद्र पिसाळ, बालाजी मुळे, राजशेखर कोरे, सत्यजित घाडगे, मुखतद्दीर इनामदार आहेत तर 
तालुका अध्यक्ष व सचिव पदसिद्ध सदस्य
उस्मानाबाद तालुका, रामेश्वर चव्हाण, गणेश घेवारे, उमरगा/लोहारा तालुका ज्ञानेश्वर बिराजदार, गोविंद जमादार, भूम/परंडा तालुका
राजेश भोरे, सुभाष जगताप, तुळजापूर तालुका संजय पवार, सय्यद इनामदार
कळंब/वाशी तालुका, सुभाष लाटे, मंगेश यादव, निमंत्रक सदस्य म्हणून बाबुराव बिरादार
पोपट माळी, दिपक कदम, नारायण शिंदे
मीडिया समिती वर अंकुश दांगट,गोरखनाथ काळे, अनिता याटे,सौ.सविता लोहार व शिवाजी लावंड यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 
Top