Views


*राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी
प्रवेशिका पाठविण्याची मुदत 28 फेब्रुवारी पर्यंत*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वछता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी दरवर्षी विविध पुरस्कार स्पर्धा घेतली जाते.2021 च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 आहे.उस्मानाबाद जिल्हयातील पत्रकारांनी या र्स्पेधेसाठी मोठया प्रमाणात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी केले आहे.
या र्स्पेधेसाठी 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील र्स्पेधकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून , विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावयाचे आहेत.अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in येथेही उपलब्ध आहेत.
 

 
Top