*लोहारा नगरपंचायत अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत दि.27 जानेवारी रोजी मुंबई येथे मंत्रालयात*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
राज्यातील 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत दि.27 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता प्रधान सचिव नावे 2 महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे आयोजन केले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये लोहारा नगरपंचायत अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. सध्य स्थितीत कोवीड 19 च्या संक्रमणामुळे विहित केलेले अयोग्य विषयक निकष विचारात घेता, सदर सोडतीसाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागिय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहावे. सदरील सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थीत राहण्यासाठी आपल्या कार्यालयात दुरदॄष्ट प्रणाली व्हिडिओ कॉन्फरन्स V.C. ची व्यवस्था करावी. सदर सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतीच्या कार्यालयातील 10 लोकप्रतिनिधींना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे, असे नगरविकासचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी विभागिय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक सर्व यांना काढले आहे.