*आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर पिकासाठी*
*ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत जिल्ह्यात दि. 20 डिसेंबर 2021 पासून NEML पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात नाफेडकडून 19 तूर खरेदी केंद्र मंजूर केली आहेत .
तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी 7/12 उतारा आणि त्यावर तूर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स (बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोड स्पष्ट असावा) या कागदपत्राची आवश्यकता आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील ता.ख.वि.सह.संस्था उस्मानाबाद, वसुंधरा ॲग्री फार्मस प्रोड्युसर कं.लि.कनगरा, विकास कृषी प्रक्रिया व पणन सह.संस्था उस्मानाबादसाठी टाकळी (बेंबळी) येथे खरेदी केंद्र आहे. उमरगा तालुक्यातील श्री.स्वामी समर्थ सर्व सेवा सं.म.गुंजोटीसाठी उमरगा, विविध कार्य सेवा सह संस्था लि.गुंजोटी, दिनकरराव जावळे पाटील ॲग्रो फुड प्रो.कं.नागुर यांच्यासाठी खरेदी केंद्र उमरगा येथील मुरुम, लोहारा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण कृ.उ.वि.स.स.नागुरसाठी लोहारा, जगदंब खरेदी विक्री सह संस्था लोहारासाठी कानेगांव, दस्तापूर विविध कार्य सेवा सह संस्था दस्तापूर यांच्यासाठी खरेदी केंद्र दस्तापूर, तुळजापूर तालुक्यातील ता.शेतकरी सह ख.वि.संघ लि.तुळजापूर, श्री.खंडोबा पणन सहकारी संस्था अणदुर (नळदुर्ग), कळंब तालुक्यातील एकता खरेदी विक्री सह संस्था उस्मानाबादसाठी कळंब, राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सह सं.चोराखळी, भुम तालुक्यातील श्री. शिवाजी भुम ता.शे.सह.ख.वि.भूम, तनुजा महिला शेतीपुरक सं.पु.स.सं.सोन्नेवाडीसाठी ईट, कै.उत्तमराव सोन्ने कृषीमाल पु. सह. सं.म. सोन्नेवाडी, वाशी तालुक्यातील तालुका शेतकरी सह संस्था लि.वाशी, कै.बलभिमराव देसाई पवार कृषी प्रक्रिया सह संस्था मर्या.पारगांव, परंडा तालुक्यातील श्री.साई कृपा कृषी पुरक सह. संस्था परंडा याप्रमाणे सबएजंट संस्थेकडे नोंदणी करावी.
खरेदी केंद्रानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. त्यांनतर तूर खरेदीस सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांस एसएमस आल्यानंतरच तूर स्वच्छ वाळवून FAQ दर्जाचा तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी . या योजनेचा जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.एम.सोमारे यांनी केले आहे.