*निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांचे ट्रेसिबीलीटीनेट अंतर्गत नोंदणी सुरु*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
राज्यातील जास्तीत जास्त फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन करुन युरोपीयन व इतर देशांना निर्यात केले जाते. युरोपीयन देशांनी किडनाशक उरर्वत अंश मुक्ताची हमी अट घातल्याने 2004-05 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात येते. 2021-22 या वर्षाकरीता नोदंणीची कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांच्या कार्यालया मार्फत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. राज्यात मोठया प्रमाणात फळे व भजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे.विशेषत: द्राक्ष,डाळींब,आंबा,संत्री या फळपिकांची आणि विविध भाजीपाला पिकांची व्यवसायिक दृष्टीकोणातून लागवड करुन नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येत आहे. जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांबरोबर स्थानीक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षतेबाबत विशेषता किडकनाशक उर्वरीत अंशाबाबत जागरुक्ता निर्माण झालेली आहे.
ग्रेपनेटच्या यशस्वी अंमलबजावणी लक्षात घेऊन आंब्याकरीता मॅगोनेट, डांळीबा करीता अनारनेट, भाजीपाला पिकाकरीता व्हेजनेट, व संत्रा मोसंबी लिंबू करीता सिट्रसनेट, या पिकांच्या ऑनलाईन नोंदणीकरीता अपेडाच्या साईटवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. या सुविधांचा वापर करुन जास्तीतजास्त फळे आणि भाजीपाला पिकांची नोंदणी करण्याकरीता ऑनलाईन निर्यातक्षम बागाची नोदंणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
किटकनाशकाच्या अतिवापरामुळे आरेाग्याच्या सुरक्षिततेबाबत,"सुरक्षीत अन्न पिकवा" ची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्रशासनाने सुचित केलेले आहे.तसेच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना किटकनाशक उर्वरीत अंशाची हमी देण्याकरीता भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरनाने अधिकतम उर्वरीत अंश मर्यादा MRL निर्धारीत केलेल्या आहेत. 2021-22 मध्ये निर्यातक्षम बागांचे नेांदणी करण्याकरीता व बागांची तपासणी करण्याकरीता प्रत्येक तालुकयातील सर्व कृषी सहायक,कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांनी तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत. निर्यातक्षम
बांगांची नोंदणी करण्याचा कालावधी निर्धारीत करण्यात आला आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
ट्रेसीबीलीटीनेट
ऑनलाईन नेादणीचा कालावधी
1
द्राक्ष - ग्रेपनेट
नोंव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022
2
आंबा - मॅगोनेट
डिसेंबर 2021 ते मार्च 2022
3
डाळींब - अनारनेट
वर्षाभर सुरु आहे
4
भाजीपाला - व्हेजनेट
वर्षाभर सुरु आहे
5
लिंबुवर्गीय फळपिके - सिट्रसनेट
वर्षाभर सुरु आहे
6
बिलवाईननेट
वर्षाभर सुरु आहे
ग्रेपनेट कार्यप्रणालीवर द्राक्ष बागेची नोंदणी करण्यासाठी उत्पादक शेतक-यांनी आपले अर्ज,शेताचा दर्शक नकाशा आणी 7/12,8अ उतारा, 50 रु शुल्क भरुण नजिकच्या कृषी विभागाच्या कार्यालयास सादर करावा. द्राक्षबाग नोंदणी प्रमाणपत्राची वैधता ही तीन वर्षासाठी असली, तरी दरवर्षी बागेचे नुतनीकरण करुण घ्यावे लागेल. तरी जिल्हयातील सर्व शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या फळे आणि भाजीपाला बागांची ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करुन घ्यावी, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.