*महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुली झाल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारने सर्व मंदिरे खुली केली आहेत. मंदिरे दर्शनासाठी भाविकांसाठी खुली झाल्याने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील जगदंबा मंदिर येथे घंटा वाजवुन व पेढे वाटप करुन आनंदोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृ.उ.बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, भाजपा जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जि.का.सदस्य कमलाकर सिरसाठ, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, नितीन जेवळीकर, सिध्देश्वर बिडवे, कल्याण ढगे, गौरव गोस्वी, संदिप पाटील, प्रतिक गोस्वी, रोहित नारायणकर, शुभम माळी, सागर गिरी, स्वप्नील नारायणकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.