Views*श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा*
   उस्मानाबाद/प्रतिनिधी

   शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.  
 श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत:स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते. उद्या (दि. 14 रोजी) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापनव रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे. 
                                                       
 
Top