Views*राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची नेमणूक करा - भाजपा महिला मोर्चाची मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिनांक २२ सप्टेंबर रोजी केली आहे. राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून राज्यपाल यांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिले होते परंतु शिवसेना पक्षाचे प्रमुख यांनी लिहिलेले पत्र दुर्दैवी आहे महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या दुर्दैवी घटना थांबविण्यासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून चर्चा करून ठोस उपाय योजना पुढे येतील व त्या आधारे राज्य सरकार कडून कृती केली जाईल ही सर्वसामान्य महिलांची अपेक्षा आहे. संवैधानिक संरक्षण व अधिकार असलेल्या राज्य महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे महाराष्ट्राच्या महिला आयोगाचे अध्यक्षपद २० महिन्यापासून रिक्त आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांना अर्धन्यायिक अधिकार असतात त्यामुळे महिलांना तेथे न्याय मागता येतो महिलांना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यास संकोच वाटतो किंबहुना पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर गोपनीयता राहात नसल्याने पोलीसांकडे तक्रार करण्या ऐवजी महिला आयोगाकडे तक्रार करणे योग्य वाटते राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील सरकार महिला अध्यक्षाची नेमणूक का करत नाही राज्याचे प्रमुख म्हणून आपली ती जबाबदारी आहे आपण ती का पार पाडत नाहीत इतर राज्यातील घटनांकडे आपण लक्ष वेधणे सहाजिकच असले तरी आपण आपली जबाबदारी का पूर्ण करत नाहीत राज्यातील महिलांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या घटना आपणास अस्वस्थ करत नाहीत का याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी १५ सप्टेंबर रोजी आपल्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्याची मागणी देखील केली आहे.
 महिलावरील अत्याचारांचा विषय राष्ट्रव्यापी असल्याचे सांगत महिला सुरक्षित सारख्या गंभीर व संवेदनशील विषयावर असंवेदनशीलता दाखवत राजकारण सुरू आहे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी या कृतीचा जाहीर निषेध करते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वाढते प्रमाण राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी व राज्यपाल यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी जिल्हा भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपाच्या अर्चना अंबुरे, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा विद्या माने, भाजपा युवती मोर्चा जिल्हाध्यक्षा पुजा राठोड, अनुराधा जाधव, रोहिणी पाटील, माधुरी देवकते, लता शिंगाडे, आदींच्या सह्या आहेत.
 
Top