Views


*फसवणूक करणाऱ्या बनावट नववधुसह चौघे अटकेत*


भूम/प्रतिनिधी

 ग्रामीण, शहरी भागत सद्या विवाह करण्यासाठी मुलाला मुलगी मिळत नसल्यामुळे, मध्यस्थी, एजंट मार्फत मुलगी पाहतात आणि लगेच विवाह उरकून घेणायची एक कलमी कार्यक्रम सुरू आहे.याचाच फायदा घेणारी नववधूची गँग संपूर्ण राज्यसह देशात सक्रिय आहे.असाच प्रकार भूम तालुक्यातील अंबी येथील विश्वनाथ भोसले यांनी एजंटच्या मार्फत मुलगा बाळासाहेब विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणी सोबत दि. १८ सप्टेंबर रोजी मोजक्या लोकांसमक्ष संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहान्याने ती नववधू विवाहातील दागिन्यांसह तीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली. यावरुन अंबी पो.ठा. येथे गु.र.क्र. 146 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 406, 420, 34 अंतर्गत नोंदवण्यात आला.
 
            अंबी पो.ठा. च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोहेकॉ- पाटील, पोना- लक्ष्मन माने, सिध्देशवर शिंदे, पोकॉ- सतीश राऊत, रामकिसन कुंभार, प्रभु,  कातुरे, साबिया शेख यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून बनावट वधू- पुजा ओढणे, आप्पा भांगे, शुभम दवणे, नारायण सोनटक्के अशा चौघांना विवाहातील दागिन्यांसह नांदेड येथून अटक केले आहे.    (सोबत छायाचित्र जोडले )
 
Top