Views


*मस्सा येथील लसीकरण केंद्रास राष्ट्रवादीचे दुधगावकर यांची भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 कळंब तालुक्यातील मस्सा येथील उपकेंद्रातील लसीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी बुधवारी (दि.1) भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील नागरिकांना गर्दी न करता शांततेत लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश देशमुख, वक्ता प्रशिक्षण विभागाचे तालुकाध्यक्ष रंजीत वरपे, राष्ट्रवादीचे अनंता वरपे, रामा इंगोले, तंटामुक्तीचे अध्यक्ष विक्रम वरपे, गणपत थोरात, नंदकुमार घाडगे, किरण तांदळे, ऋषिकेश थोरात, संतोष तिकोने, सर्जेराव इंगोले, अजित वरपे, पांडुरंग थोरात, बांगर आदींची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय पाटील दुधगावकर यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा वह्या देऊन सत्कार करण्यात आला.
 
Top