Views


*महा विकास आघाडी सरकारला मंदीर उघडण्यासाठी व जाग आणण्यासाठी भाजपाच्या वतीने कालिकादेवी मंदीरात घंटानाद आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महा विकास आघाडी सरकारला मंदीर उघडण्यासाठी व जाग आणण्यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली अनाळा जि.प.गटातील प्रमुख कार्यकर्ते शक्तिकेंद्र प्रमुख बुथप्रमुख यांचे कालिकादेवी मंदीरात घंटानाद आंदोलन. यावेळी मंदीरात घंटानाद करुन सणासुदीच्या दिवसात मंदीर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी परंडा भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटिल, बाळासाहेब गोडगे, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, जोतीराम क्षीरसागर, निशिकांत क्षीरसागर, बिभिषण अप्पा शिंदे, चांगदेव चव्हाण, साहेबराव पाडुळे कांतीलाल पाटील, महादेव बारसकर, अजित शिंदे, विनोद कदम,अशोक शिंदे, किरण देशमुख, ज्ञानेश्वर काळे, श्रीकृष्ण शिंदे, आदेश तिंबोळे, विक्रम देवकर, सारंग घोगरे, विजय खैरे, पांडुरंग थोरात, भारत जाधव, बप्पा जाधव, बाबु गायकवाड, हरी शिंदे, अण्णासाहेब झिरपे, भारत पवार, नवनाथ लावंड, रणजित झिरपे, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
 
Top