Views


*महा विकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा चिंचपुर बुद्रुक चे शंखनाद आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपुर बुद्रुक येथील हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्माई मंदिर येथे भारतीय जनता पार्टी शेळगाव गट यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धार्मिक स्थळे उघडण्यासाठी व या मोगलाई सरकारला जाग आणण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चिंचपूर बु गणाचे भाजपा पंचायत समिती सदस्य सौ.अश्विनी सतीश देवकर यांचे प्रतिनिधी सतीश कैलास देवकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, परंडा भाजपा सोशल मिडिया सेल अध्यक्ष आकाश देवकर, उपस्थित होते. तसेच चिंचपुर बुद्रुक चे सरपंच शिंदे, उपसरपंच सावंत, देवगाव बुद्रुक भाजपाचे चे सरपंच ठाकरे, उपसरपंच सुग्रीव कदम, ग्रामपंचायत सदस्य दादा आरे, ईश्वर शिंदे,चिंचपुर बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य महेश देवकर, भागवत शिंदे, शितल सुतार, विद्या सावंत, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top