Views*महावसुलीत रमलेल्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -- भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेवराव काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणे तर सोडाच उलट महावसुली करण्यात रमलेल्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे अशी घणाघाती टिका भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवराव काळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शेतकरी संवाद अभियान राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे पुजन करून केली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्यकाळात घेतलेले निर्णयांची माहिती दिली. यामध्ये पंतप्रधान स्वाईल हेल्थ कार्ड, MSP ची पुनर्रचना, पंतप्रधान किसान सन्मान अर्थसहाय्य योजना, APMC सुधारणा केल्या, करार शेती कायदा असे अमुलाग्र बदल केले, हे करताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडुन शेतकऱ्यांना भ्रमित करण्यासाठी मोठा प्रयत्न केला गेला असा आरोप ही त्यांनी केला.ज्ञपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, रंगनाथ सोळंकी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारी सदस्य व्यंकटराव गुंड, खंडेराव चौरे, सरचिटणीस नितीन भोसले, रामदास कोळगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, नानासाहेब कदम, साहेबराव घुगे, मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे, अभय इंगळे, पूजा देडे, लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, लोहारा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, बालाजी चव्हाण, गजानन वडने, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने
 उपस्थित होते.
 
Top