Views


*अखिल भारतीय जागरी मॅन्यूफॅक्चरर असोसिएशनची कार्यकारणी गठित*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 इंदापूर येथे देशातील सर्व गुळ कारखान्यांच्या संचालकांची सोनाई ग्रुप चे अध्यक्ष दशरथ दादा माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व कारखान्यांच्या संचालकांच्या संमतीने अखिल भारतीय जागरी मॅन्यूफॅक्चरर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ दादा माने यांची अध्यक्ष पदी, रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड.व्यंकटराव गुंड यांची कार्याध्यक्ष पदी, उपाध्यक्ष पदी डी.डी.एन.कारखान्याचे एम.डी.विजय नाडे, सातारा येथील वर्धन शुगर्स चे चेअरमन धैर्यशील कदम, नांदेड येथील मारोतराव कवळे गुरुजी तर असोसिएशनच्या सचिव पदी श्री सिध्दीविनायक उद्योग समूहाचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सहसचिव पदी कोल्हापूर येथील घोडावत फुड्स चे सुनील शहा व कोषाध्यक्ष पदी गुळमेश्र्वर ॲग्रो चे चेअरमन बापूराव चव्हाण यांची तर उर्वरित सर्व सदस्यांची असोसिएशनचे संचालक म्हणून निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय जागरी मॅन्यूफॅक्चरर असोसिएशनचे प्रश्न घेऊन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचे ठरले.
 
Top