Views



*एम.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व मानसिक छळ करु नका -- भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 स्वप्निल लोणकर या युवकाची आत्महत्या म्हणजे राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा बळी! पुण्याच्या स्वप्नील लोणकर ह्या 24 वर्षाच्या युवकाने महाविनाश आघाडीच्या निराशाजनक कृत्यामुळे आत्महत्या केली. गेल्या 2 वर्षांपासून एम.पी.एस.सी.च्या काही मुलाखती झाल्या तर काही नाही झाल्या नौकरीवर रुजू केले नाही, असा खेळखंडोबा महाविकास आघाडी सरकारने त्यांनी केला असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा कार्यक्रम एककलमी करत आहे. राज्यसरकारने त्वरित ह्या विषयात लक्ष देऊन, ठोस पाऊले उचलावी, अन्यथा भाजयुमो आक्रमक पवित्रा घेईल, असे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, स्वप्नील लोणकर या युवाने एमपीएससी परीक्षा पास होऊनही अजून मुलाखत होत नाही आणि त्यामुळे नोकरी लागत नाही या सरकारी ढिसाळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली. पुर्व परिक्षा, मुख्य परिक्षा, मुलाखत अश्या प्रकारे काठीण्याची उच्च पातळी पार करत एमपीएससी ची तयारी करीत असणारा प्रत्येक विद्यार्थी पुढे जात असतो, त्यानंतर त्याच्या पदरी यश प्राप्त होणार असत! परंतु जर सरकारच्या निष्काळजी धोरणामुळे वर्षामागून वर्ष लोटूनही परीक्षाच होणार नसतील, त्यांच्या मुलाखती रखडणार असतील तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याची होणारी राख रांगोळी याला जबाबदार कोण? हा प्रश्न आज राज्यातले हजारो युवा विचारत आहेत आणि त्यामुळे स्वप्निल लोणकर याची ही आत्महत्या नसून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा नाहक बळी आहे! अशी भावना आज तमाम युवा वर्गामध्ये आहे. परंतु मेहनती शीवाय सत्तेत आलेल्या जुगाडी सरकारला विद्यार्थ्यांच्या मेहनतीची काय कदर असणार! असा प्रश्न निमार्ण झाला आहे आहे. भारतीय जनता युवा मोर्चाची आग्रही मागणी करीत आहे की, स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना किमान रु.25 लाख इतकी मदत देण्यात यावी आणि सदर विषयात तातडीने ठोस निर्णय करावा व सर्व निकाल लवकर घोषीत करुन विद्यार्थी, युवकांना न्याय द्यावा अन्यथा, भारतीय जनता युवा मोर्चा प्रत्येक मंत्र्यांच्या ठीकठिकाणी गाड्या अडवून जाब विचारेल आणि न्याय मिळेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोबत ठामपणे उभे राहून संघर्ष करीत राहील, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, सरचिटणीस देवकन्या प.गाडे, पवार दाजी नवनाथ, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, राज निकम, सुरज शेरकर, राहुल शिंदे, गणेश ऐडके, तेजस सुरवसे, यांच्यासह युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थीत होते.
 
Top