Views


*परंडा शहरातील आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, आघाडी व मोर्चाचे मंडलाध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख यांची बैठक संघटनमंत्री मराठवाडा संजयजी कौडगे यांच्या उपस्थितीत संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

परंडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका पदाधिकारी सर्व आघाडी व मोर्चाचे मंडलाध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख यांची महत्वपूर्ण बैठक शहरातील आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात संघटनमंत्री मराठवाडा संजयजी कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी संजयजी कौडगे यांनी संघटनात्मक आढावा घेऊन शक्ती केंद्र प्रमुख यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रदिप शिंदे, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. तानाजी वाघमारे, विकास कुलकर्णी, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, तानाजी पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.आनंद मोरे, साहेबराव पाडुळे, विठोबा मदने, निशिकांत क्षिरसागर, रमेश पवार, सतिष देवकर, श्रीराम देवकर, प्रमोद लिमकर, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, सागर पाटील, शरद कोळी, युसुफ पठाण, दत्ता ठाकरे, कांतीलाल पाटील, श्रीकृष्ण शिंदे, सुभाष लटके, आप्पा मुसळे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top