*युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात कोरोना कक्षातील कोरोना रूग्णांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे यांच्यावतीने पौष्टिक आहार, खाद्यपदार्थ, फळे वाटप*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचा 40 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक विचार आत्मसात करून लोकनेते तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या सेवेस सदैव तत्पर असणाऱ्या युवानेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात कोरोना कक्षातील कोरोना रूग्णांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे यांच्या वतीने फळे व पौष्टिक आहार, खाद्यपदार्थचे वाटप करण्यात आले. यावेळी युवती पदाधिकारी दिपज्योती आकोसकर, दवाखान्यातील डॉ.परिचारिका वार्डबाँय, अदि, उपस्थित होते.