Views


*डिग्गी येथे मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे ॲड.शितल चव्हाण फाउंडेशन व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन गावचे नुतन प्रभारी सरपंच संतोष कवठे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मायक्रोकॉम कॉंप्युटरचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, प्रथमचे सुमिथ कोथिंबीरे, उमेदचे किशोर औरादे, ग्रामसेवक शिनगारे, ग्राम पंचायत सदस्य गुरुबसय्या स्वामी, माजी सरपंच सतिश कलशेट्टी, विनोद गायकवाड, उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत 8 वी ते पदवी अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या 18 ते 35 वयोगटातील तरुणांना विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण व रोजगार याविषयी माहीती देण्यात आली. यावेळी अनेक बेरोजगार युवकांनी नावनोंदणी केली. यावेळी सरपंच कवठे, प्रा. मुल्ला, कोथिंबीरे, औरादे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज गायकवाड यांनी केले तर आभार जिवन एकंबे यांनी मानले. यावेळी गावातील बेरोजगार युवक उपस्थित होते.
 
Top