Views







*लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीचे थकीत विज बिल माफ करण्यात यावेत, अशा विविध मागण्यासाठी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर टाळा ठोक हल्लाबोल आंदोलन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीचे थकीत विज बिल माफ करण्यात यावेत व शेतकऱ्यांना 8 तास विज वेळेवर देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धिजिवी प्रकोष्ट संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा महावितरण कार्यालयासमोर टाळा ठोक हल्लाबोल आंदोलन दि.5 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तालुका भाजपाच्या वतीने महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील 75 लाख विज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचे नोटीस पाठवुन महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या तुघलकी महाराष्ट्र सरकार व महावितरण कंपनीचा जाहिर निषेध करून टाळटोक आंदोलन करीत आहोत. महावितरण कंपनीने 75 लाख ग्राहकांना दिलेल्या नोटीसा परत घ्याव्यात, शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी 8 तास विज पुरवठा द्यावा, शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने विजबिल वसुल करण्यात येऊ नये, लॉकडाऊन काळातील सर्व विजबिल माफ करण्यात यावा, आवाच्या सवा बिल आकारणी करु नये व जास्तीची आकारणी केलेली विज बिल कमी करण्यात यावे, अन्यथा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, पं.स. सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, प्रशांत काळे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कमलाकर शिरसाट, प्रविण चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, अशोक तिगाडे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top