*लोहारा शहरातील विविध प्रभागातील नाले, रस्ते, विद्युत पोलासाठी व शहरातील तलाव, मुख्य रस्ता असलेला ग्रामीण रुग्णालय यावरती दुभाजकाच्या कामासाठी नगरपंचायतला निधी द्यावा -- उपनगराध्यक्ष प्रताप घोडके*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
लोहारा शहरातील विविध प्रभागातील नाले, रस्ते, विद्युत पोलासाठी व शहरातील तलाव, मुख्य रस्ता असलेला ग्रामीण रुग्णालय यावरती दुभाजकाच्या कामासाठी लोहारा नगरपंचायतला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. उस्मानाबाद येथे केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत उस्मानाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचा दि.16 जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उस्मानाबाद येथे आले असता त्यांना या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा शहरातील अनेक प्रभागात नाले, रस्ते, विद्युत पोल नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. मुख्य रस्ता असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ग्रामीण रुग्णालय या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी दुभाजका साठी निधी उपलब्ध करून ध्यावा. शहरातील तलावाचे सुशोभिकरण करून एक पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी आपल्या स्थारावरून निधी द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, नगरसेवक शाम नारायणकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी पं.स. सदस्य सुधीर घोडके, आदी उपस्थित होते.