Views




*लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी गावपुढाऱ्यांना बाजुला सारीत बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी गावपुढाऱ्यांना बाजुला सारीत बहुतांश नविन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. लोहारा तालुक्यातील निवडणूक लागलेल्या 26 ग्रामपंचायती पैकी आरणी, मार्डी, धानुरी, तावशिगड, राजेगाव, हे पाच गावे बिनविरोध निघाली होती. उर्वरित राहिलेल्या लोहारा तालुक्यातील 21 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल दि.18 जानेवारी रोजी जाहीर झाले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीला तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. दहा टेबलांवर मत मोजणी झाली. 21 ग्रामपंचायतींच्या निवडून द्यावयाच्या 138 जागेसाठी अटीतटीच्या लढती झाल्या. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरूणांनी सक्रिय सहभाग घेत ज्येष्ठ गाव पुढाऱ्यांपुढे कडवे आव्हान उभे केले होते. वर्षानुवर्ष सत्तेवर ठाण मांडून बसलेल्या गावपुढाऱ्यांना मतदारांनी नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांच्या हातात गावांची सत्ता दिली आहे. तालुक्यातील भातागळी, कानेगाव, कास्ती (खुर्द), होळी, हिप्परगा (सय्यद), यासह बहुतांश गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. कानेगाव येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलची सत्ता कानेगावच्या 13 जागेसाठी शिवसेना पुरस्कृत संत मारूती महाराज ग्रामविकास पॅनल व काँग्रेस पुरस्कृत संत कृपा ग्रामविकास पॅनलमध्ये अतितटीच लढत झाली. तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात शिवसेनेच्या पॅनलने 13 पैकी 13 जागावर विजय मिळवत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा धुवाँ उडवला आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पुरस्कृत पॅनलला एकही जागा जिंकता न आल्याने नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव लोभे यांनी पहिल्यांदाच एक हाती विजय मिळवत गावची सत्ता हस्तगत केली आहे. तर काँग्रस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांना परभवाला सामोरे जावे लागले आहे.
भातागळी ग्रामपंचायतीवर शंभो महादेव पॅनलची सत्ता
राजकीय वलय लाभलेल्या भातागळी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. शंभो महादेव ग्रामविकास पॅनलने 11 पैकी सात जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर कब्जा केला आहे. दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या साई प्रतिष्ठान ग्रामविका पॅनलला या निवडणुकीत जनतेने सपसेल नाकरले असून केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले आहे. कास्ती (खुर्द) ग्रामपंचात निवडणुकीत चुलत्यापेक्षा पुतण्या ठरला सरस तालुक्यातील कास्ती (खुर्द) ग्रामपंचातीची निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरली. चुलता - पुतण्याच्या राजकीय लढाईत पुतण्या सरस ठरला आहे. महेश पाटील व सागर पाटील हे चुलते पुतणे असून दोघेही तरूण आहेत. शिवाय दोघेही काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यक्रर्ते आहेत. महेश पाटील यांची ग्रामपंचातीवर सत्ता आहे. परंतु मागील काही वर्षापासून या चुलत्या पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. यंदाच्या ग्रामपंचाय निवडणुकीत महेश पाटील यांच्या विरोधात सागर पाटील यांनी दंड थोपटत शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी पॅनल तयार करून महेश पाटील यांच्या संत मारूती महारज पॅनलसमोर कडवे आव्हान उभे केले. यात सागर पाटील यांच्या पॅनलने सर्व सात जागांवर विजय संपादन करत चुलत्याच्या पॅनलचा धुवाँ उडवला. शिवाय प्रभाग तीनमधून सागर पाटील यांनी चुलते महेश पाटील यांना पराभूत करून आपणही राजकारणात कमी नसल्याचे दाखवून दिले. 
काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व त्यांची पत्नी दोघेही पराभूत
तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचातीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटी व त्यांच्या पत्नी अर्चाना पाटील पराभूत झाले आहेत. प्रभाग पाचमध्ये अमोल पाटील व युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव लोभे यांच्यात लढत झाली. यात लोभे यांनी पाटील यांच्यावर मात करीत बाजी मारली. तर प्रभाग तीनमधून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव आशा कदम यांनी केला. 
कास्ती बु येथे ग्रामविकास पॅनलचे 9 पैकी 8 जागा विजयी झाले. तर कलेश्वर ग्रामविकास पॅनल चा उमेदवार विजयी झाला नाही. 1 जागा रिक्त राहिली. मोघा बु व मोघा खु या दोन्ही संयुक्त ग्रामपंचायत 7 पैकी 6 जागेवर शंभो महादेव आदर्श ग्राम विकास त्यांनी विजय मिळवला. तर परिवर्तन पॅनल ला 1 जागेवर समाधान मानावे लागले. बेलवाडी येथे 7 पैकी 6 जागेवर राष्ट्रवादी भाजप पुरस्कृत मसोबा विकास पॅनलने विजय मिळविला. यात ग्रामदेवी मसोबा पॅनलचे उमेदवार विजयी झाला नाही. तर 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अश्टा कासार येथे 15 पैकी 13 जागांवर ग्राम विकास पॅनल विजयी तर महा विकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. होळी येथे 8 पैकी 5 जागेवर परिवर्तन ग्रामविकास पॅनल तर इन जागेवर माझ गाव ग्राम विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले. बोरगाव भोसगा येथे भाजपा, शिवसेना, काँग्रेस पुरस्कृत बळीराजा ग्रामविकास पॅनल चे पाच बिनविरोध तर 4 साठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये 4 ही सदस्य बळीराजा पॅनलचे विजयी झाल्याने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. हिप्परगा सय्यद येथे शिवसेना पुरस्कृत फॅमिलीने 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवला. तर प्रतिस्पर्धी पॅनलला 2 जागा मिळाल्या.
परळी येथे नवतरुण ग्राम विकास पॅनलचे 5 तर प्रतिस्पर्धी ग्राम विकास पॅनलचे 2 उमेदवार विजयी झाले. एकोंडी लो विकास पॅनल चे 6 सदस्य तर आदर्श ग्राम विकास पॅनल चा 1 उमेदवार निवडून आला. यावेळी दिनकर लाळे व राजेंद्र घोडके यांना समान 57 मते पडली होती. तोच करून दिनकर लाळे यांनी बाजी मारल्याने त्यांना विजयी घोषित केले. उदतपूर 7 पैकी 5 जागा बिनविरोध निघाल्या असून
3 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले. फनेपूर येथे सात पैकी सहा जागा बिनविरोध निघाल्या होत्या. तर एका जागेसाठी निवडणूक झाली. दत्तापूर येथे 9 पैकी 4 जागा बिनविरोध पाच जागांसाठी निवडणूक झाली यामध्ये महाविकासआघाडी पॅनलचा 4 बिनविरोधकांसह इतर 5 जागी विजय झाला.
लोहारा खुर्द येथे 9 पैकी ग्राम विकास पॅनल चे 3 बिनविरोध उर्वरित 6 जागेसाठी निवडणूक झाली. त्यात 5 जागा बिनविरोध विजिटर प्रतिस्पर्धी ग्रामविकास पॅनलला 1 जागेवर समाधान मानावे लागले. कोंडजिगड येथे 9 पैकी 7 जागा ग्राम विकास आघाडी पॅनलच्या बिनविरोध निघाल्या 2 जागेसाठी निवडणुक झाली. या 2 जागेवर बिनविरोध पॅनलचे विजयी झाले. करजगाव 7 पैकी 1 बिनविरोध 6  जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये काँग्रेस पुरस्कृत पांडुरंग कृपा पॅनलचे 1 बिनविरोध सह 6 उमेदवार विजयी झाले. तर विरोधी पॅनल ला 1 जागा मिळाली. करवंजी ते 7 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल चे 5 उमेदवार विजयी झाले तर जय हनुमान पॅनलचा 2 जागांवर विजय झाला. काटे चिंचोली येथे एकूण 1 पैकी 1 जागा बिनविरोध उत्तर 6 जागांसाठी निवडणूक झाली. ग्रामविकास परिवर्तन पॅनलला  बिनविरोध एकसह 4 जागांवर विजय मिळाला. ग्रामविकास पॅनेल 3 जागांवर विजयी झाले. होळी येथे 8 जागेसाठी दोन पॅनल च्या वतीने 16 व 1 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली. या 8 पैकी ग्रामविकास पॅनल चे 5  उमेदवार निवडून आले तर माझं गांव ग्रामविकास पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार डॉक्टर रोहन काळे उपस्थित होते. या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले व पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
 
Top